,,,,,अशीही कृतज्ञता,,,! शिंगणापूर कोव्हीड सेंटर कोरोना रुग्णासाठी नवसंजीवनीच.....
प्रथमेश वाडकर /बालिंगा प्रतिनिधी :- कोरोना रोगाच्या संकटात सापडून त्यावर मात करून आलेल्या आमशी (ता. करवीर) येथील अनिल बापू पाटील यांनी डॉक्टर व स्टाफचा सत्कार केला. औषधोपचारा बरोबर डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीमुळे आपण कोणावर मात करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. डॉक्टरांना या संकटात प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यामुळे शिंगणापूर कोविड सेंटर येथे पेशंटने केलेल्या सत्कारमुळे सर्वच भारावून गेले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेने शिंगणापुर तालुका करवीर येथे ग्रामीण भागातील लोकांसाठी कोविड सेंटर उभे केले आहे. काही दिवसापूर्वी आमशी येथील अनिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांना शिंगणापूर कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती नाजूक असतानाही वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास भोई व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपुलकीची वागणूक देत त्यांच्यावर उपचार केले. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर पाटील कोरोना मुक्त होऊन घरी आले. आपण या जीवघेण्या संकटातून फक्त डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपचाराच्या पद्धती व त्यांच्या प्रोत्साहनामुळे बरे झालो. त्यामुळे आपण कृतज्ञता व्यक्त म्हणून डॉक्टरांचा सत्कार करण्याचे त्यांनी ठरवले. आज त्यांनी डॉक्टर व इतर सर्व सहकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार केला.
यावेळी या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास भोई,डॉ. वर्षा जाधव,डॉ.अंकिता निकम,डॉ. रुपाली जमदाडे,डॉ. श्रद्धा पाटील,सिस्टर - शितल पाटील ,रुपाली लोहार ,सुप्रिया भोई,पूनम कांबळे, सुनीता पाटील,उज्वला कुंभार,पल्लवी पाटील, अस्मिता कांबळे,फार्मासिस्ट -शितल पाटील,लॅब तंत्रज्ञ- संदीप कुर्तडकर,सचिन कुर्तडकर,वॉर्ड बॉय - पवन पाटील,प्रवीण पाटील, सुशांत कांबळे , शुभम कांबळे,डाटा ऑपरेटर- रोहन कांबळे,सुपरवायझर - भगवान पोवार,अवधूत पाटील,अक्षय गवंडी,रामचंद्र पांढरे, राजेंद्र टिळके, पवन गडगले,आनंदा पाटील, अशोक पाटील (आमशी) उपस्थित होते.
चौकट
शिंगणापूर कोविड सेंटर येथे डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी उपचारा बरोबर पेशंट सोबत आपुलकीने वागतात. सर्व पेशंटना धीर देण्याचे काम करतात. त्यामुळेच आपण या जीवघेण्या संकटातून बाहेर पडलो.- अनिल पाटील (कोरोनामुक्त पेशंट)
चोकट
उपचारासाठी दाखल झालेल्या सर्व रुग्णावर वेळीच व योग्य ते उपचार येथे केले जातात. येथील सर्व स्टाफ सर्वांच्या बरोबर मैत्री स्वरूपात काम करतात. आज पेशंटने केलेल्या सत्कारामुळे आम्हाला याकामी अधिक प्रोत्साहन मिळाले आहे.- डॉ. सुहास भोई
No comments