Header Ads

Header ADS

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार. जयवंत उगले*.



बालिंगा : प्रतिनिधी :- ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्रामस्तरावरील महत्वाचा घटक आहे. शासनाने वेळोवेळी घेतलेल्या विविध विकास कामाच्या योजना यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी मागणी केलेल्या मागण्यांची लवकरच पूर्तता करणार असल्याचे आश्वासन गटविकास अधिकारी जयवंत उगले.यांनी दिले नाही. तर पूर्तता केली. निवेदन स्विकारून  संदेश भोईटे विस्तार अधिकारी ( ग्रा. पं.) यांना माहिती दिली व पत्र तयार करून घेऊन  ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुधारित किमान वेतन सर्व ग्रामपंचायतीनी तात्काळ लागू करावे व कार्यवाहीचा अहवाल  सादर करण्यासाठी  सर्वचं ग्रामपंचायतीना मेल केला.व सदरचा आदेश ग्रामसेवक युनियन डि. एन. ई.136 चे  करवीर तालुका अध्यक्ष अभिजित चोगले  व  ग्रा. पं. चे. विस्तार अधिकारी  संदेश भोईटे. यांच्या हस्ते  कार्याध्यक्ष शिवाजी पाटील. यांच्याकडे देण्यात आला.तसेच उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन करवीर तालुका ग्रामपंचायत कामगार संघ ( आयटक संलग्न ) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बबन पाटील. ( पाचगाव ) यांना आणि त्यांच्या भेटलेल्या शिष्टमंडळास दिले.गटविकास अधिकारी जयवंत उगले. यांनी निवेदनाची तात्काळ घेतलेली दखल आणि  केलेली कार्यवाही पाहून ग्रामपंचायत कर्मचारी यांनी  कर्तव्यदक्ष अधिकारी उगले. यांचे आभार मानले. 
    करवीर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी कामगार संघाच्या वतीने करवीरचे  गटविकास अधिकारी जयवंत उगले. यांना दिलेल्या निवेदनातील आशय असा ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्रामपंचायत प्रशासनातील महत्वाचा घटक आहे. पण शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. कोव्हीड काळात जीव ओतून काम करीत आहे. त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही.तो मिळावा.त्याच बरोबर खालील मागण्यांची पूर्तता करण्यात यावी. 1)सुधारित किमान वेतन जिल्हा परिषद यांनी काढलेल्या आदेशानुसार काढण्यात यावे.
2) प्रॉव्हीडड फंड,सेवा पुस्तकं पूर्ण करण्यासाठी कॅम्प आयोजित करावेत.
3) कोव्हीड काळात केलेल्या कामाचा मोबदला मिळावा.
4) ग्रामपंचायत कर्मचारी यांचा    ग्रामपंचायत मार्फत विमा सुरु करण्यात यावा.                          आदी मागण्याचं निवेदन गटविकास अधिकारी जयवंत उगले. यांना देऊन मागण्यांची पूर्तता नाही झाली तर आंदोलन, मोर्चा आदी मार्ग अवलंबण्यात येथील असे या निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बबन पाटील. (पाचगाव ) कार्याध्यक्ष शिवाजी पाटील. ( आरळे ) करवीर तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील.( देवाळे) करवीर तालुका सचिव शिवाजी पोवार. (भुयेवाडी) संघटना सदस्य प्रकाश कांबळे. ( सावर्डे दुमाला )संभाजी राबाडे (सावरवाडी ) आदिसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

No comments