बलशाली भारत संघटनकडून डॉ. मधुरा मोरे.यांचा सत्कार
बालिंगा: प्रतिनिधी: प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमाला च्या आरोग्य अधिकारी डॉक्टर मधुरा विलास मोरे. यांना कोरोना काळातील त्यांच्या योगदाना बद्दल जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत धन्वंतरी पुरस्कार जाहीर करण्यात आला.डॉ.मधुरा मोरे.या गेली 29 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असून सेवा काळात अनेक अडचणीना तोंड देऊन आरोग्य सेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला. तसेच महापुराच्या काळात गावात साथीचा आजार पसरू नये यासाठी प्रयत्न केले होते.याची दखल जिल्हा परिषदेच्या वतीने सन2019/20 चा दिला जाणारा धन्वंतरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमालातील सर्वच स्टाफने कोरोना सारख्या अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये चांगले काम करून भागातील सर्व लोकांना उत्तम सेवा देण्याचे काम केलेले आहे .या कोरोना योद्ध्यांचा सन्मान व सत्कार करणे खूप गरजेचे होते. माजी सनदी अधिकारी व प्रसिद्ध प्रबोधनकार डॉक्टर इंद्रजीत देशमुख . यांच्या प्रेरणेने कार्यरत असणारे सावर्डे दुमाला येथील *बलशाली भारत युवा रुदय क्रांती सामाजिक संघटन* यांचेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी दत्तात्रय कारंडे, धनाजी निकम, अवधूत भोसले, किशोर नांगरे,निलेश कारंडे, कृष्णात जगताप,सुनिल खाडे , राजू भोसले ,एकनाथ खाडे .आदी उपस्थीत होते.
No comments