कुरुकली कोविड सेंटरला गाद्या प्रदान*...... संजय धुमाळ यांनी जपली सामाजिक बांधिलकी.
कुरुकली (ता.करवीर) येथील शासकीय कोवीड सेंटरला सामाजिक कार्यकर्ते संजय धुमाळ बेडच्या (गाद्या) प्रदान करताना डॉ. रोहित पाटील, डी. जी. पाटील व इतर
बालिंगा : प्रतिनिधी :-- कुरुकली (ता.करवीर) येथील शासकीय कोवीड सेंटर ला विस्तारीकरणासाठी देवाळे (ता.करवीर) येथील सामाजिक कार्यकर्ते स्वराज्य जनरल कामगार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय धुमाळ यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ रोहित पाटील यांच्याकडे गाद्या लोकार्पण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत करवीर तालुक्यात उद्रेक सुरू असून कुरूकली येथील कोवीड सेंटर विस्तारीकरणाची गरज निर्माण झाली आहे. यांची गरज ओळखून देवाळे ता.करवीर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय धुमाळ यांनी कोवीड सेंटर साठी बेडच्या (गाद्या) लोकार्पण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळी डी. जी. पाटील, सागर पाटील, संदीप पाटील,पंकज पाटील, विकास पाटील, किरण पाटील, उपस्थितीत होते.
No comments