कोल्हापूर : 
विद्यार्थी गुणवत्ता मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना जनजागृती करीता घेण्यात आलेल्या कोरोना मुक्ती संदेशदुत स्पर्धेत कोगील खुर्द (करवीर ) येथील विद्यामंदीर शाळेच्या अध्यापिका सौ .शिवानी चंद्रशेखर कानकेकर ( कोल्हापूर ) यांची शिक्षक गटातुन कोरोना मुक्ती संदेशदूत पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

            विद्यार्थी गुणवत्ता मंच महाराष्ट्र राज्य, दारव्हा यांच्या वतीने कोरोना जनजागृती करीता कोरोना मुक्ति संदेशदुत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आभासी पद्धतीने नुकताच संपन्न झाला.स्पर्धेमध्ये घोषवाक्य, चित्रकला, शार्ट फिल्म, कविता अशा विभागात स्पर्धा झाली . यामध्ये सौ .शिवानी चंद्रशेखर कानकेकर ( कोल्हापूर ) यांची कोरोना मुक्ती  संदेशदूत पुरस्कारासाठी निवड झाली आहे .

             यापूर्वी सौ . कानकेकर यांना पॅट्रीयट स्पोर्टस् ग्रुपचा २००६ चा आदर्श शिक्षक पुरस्कार, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजचा २०१८ नेशन बिल्डर ॲवाॅर्ड,महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना क्रांतीज्योती सावित्रीची लेक गुणवंत शिक्षिका पुरस्कार -२०२१ ,चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ,चंदगड २०२१ चा उखाणा  स्पर्धा प्रथम क्रमांक , सर फाऊंडेशन कोल्हापूरचा नारीशक्ती  सन्मान २०२१,श्री.भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,म्हारूळ यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार ,उडान फाऊंडेशन कागल,बाचणी यांचा शिक्षकरत्न  पुरस्कार २०२१ असे पुरस्कार मिळालेले आहेत .