Header Ads

Header ADS

कोरोना उपाय योजनासाठी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत टीम आणि कोरोना दक्षता समिती सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे- पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर

   







बीडशेड महालक्ष्मी हॉल येथे कोरोना उपाय योजना बैठकीत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सरपंच दादासो लाड, सर्जेराव तिबिले, माजी सरपंच सत्यजित पाटील व पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी आदी.

                        प्रथमेश वाडकर: बालिंगा:प्रतिनिधी करवीर तालुक्याचा पश्चिम भाग कोरोना उपाय योजनासाठी पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत टीम आणि कोरोना दक्षता समिती आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असे मत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी मांडले. कसबा बीड, सावरवाडी, गणेशवाडी, धोंडेवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दु , बहिरेश्वर, आदी गावातील सरपंच, उपसरपंच कोरोना दक्षता समिती, दूध डेअरी चेअरमन यांच्या कोरोना उपायोजना बैठकीत ते बोलत होते.

      शहराबरोबरच आता ग्रामीण भागात सुद्धा कोरोना संसर्गजन्य आजार हळू हळू वाढ होत आहे. त्या अनुषंगाने गावातील असणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अलगीकरण करणे, त्यांच्या घरातील व्यक्तींना होमक्वारंटाईन करणे नितांत गरजेचे आहे. त्याच बरोबर गावातील अत्यावश्यक दुकानांच्यामध्ये गर्दी न करता शासन स्तरावरून मास्क, सॅनी टायझर, योग्य अंतर अशा दिलेल्या नियमांचे पालन करत दैनंदिन व्यवहार चालू ठेवणे गरजेचे आहे. ज्या गावांमध्ये कोरोना पेशंट संख्या जास्त आहे, त्या गावांमध्ये कडक लॉक डाऊन करणे इत्यादी प्रमुख मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत करवीर पोलीस उपकेंद्र शिरोली दुमाला अंमलदार रवींद्र  पाटील व सुनील देसाई उपस्थित होते.

      शिरोली दुमाला ग्रामीण आरोग्य केंद्र अंतर्गत 19 गावे आहेत. या सर्व गावांची जवळपास 45000 लोकसंख्या आहे. या 19 गावांमध्ये 209 आज अखेर कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर कसबा बीडमधील सरपंच सर्जेराव तिबिले, माजी सरपंच सत्यजित पाटील, करवीर पंचायत सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, पोलीस पाटील पंढरीनाथ ताशिलदार, गणेशवाडी सरपंच दादासो लाड, पोलीस पाटील धनश्री मेढे, शिरोली दुमाला सरपंच रेखा कांबळे, बहिरेश्वर पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार, ग्रामसेवक राजाराम पाटील,विमल शेट्टी ,संदीप पाटील, बी एस कांबळे, प्रकाश जोशी आदी, तसेच सर्व कोरोना दक्षता समिती कर्मचारी उपस्थित होते. या उपायोजना बैठकीत प्रस्तावना व स्वागत करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली  तर आभार गणेशवाडीचे सरपंच दादासो लाड यांनी केले.

बीड शेड या व्यापारी पेठेत शासनाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले. म्हणून आनंद होलसेल कापड दुकान या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व दुकानदारांनी नियमांचे पालन करत नागरिकांना सोय द्यायची आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले.

.



No comments