जीवन आधार रेस्क्यू फोर्स कडून शिवरायांचा ध्वज भेट
प्रथमेश वाडकर:बालिंगा: प्रतिनिधी. संपूर्ण महाराष्ट्रात शिव स्वराज्य दिन साजरा होत आहे.6 जून 1674 म्हणजे हा शिवकालगणना प्रारंभ दिन, व हिंदवी स्वराज्य स्थापना याच शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून जीवन आधार फोउंडेशन रेस्क्यू फोर्सचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पोवार. महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार. यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र
युवक अध्यक्ष दत्ता उर्फ अरविंद कांबळे. ( खुपीरे ) व करवीर तालुका प्रमुख शिवाजी वाडकर.यांचेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुभ पाच चिन्हाने अलंकृत असलेल्या भगवा ध्वज यामध्ये ही शुभ चिन्हे आहेत. जिरेटोप, राजमुद्रा,सोन्याचे होन, जगदंब तलवार, वाघनख्या. असलेला ध्वज बालिंगा व कोगे येथील तरुण मंडळांना भेट देण्यात आला.अरविद कांबळे यांनी केलेल्या कार्याची तरुण वर्गाकडून कौतुक करण्यात आले. यावेळी राजू कोरवी,दै.गगनताराचे पत्रकार प्रथमेश वाडकर, उज्वल मुगदे, अजय वाडकर, आकाश मुगदे, शुभम जाधव, ऋषीकेश जाधव, प्रथमेश घोडके, अशोक राजेशीर्के, संग्राम कांबळे, सुनील माने,मयुरेश घोडके, पियुष कांबळे, सार्थ - पार्थ मेथे, बालिंगा व कोगे येथील तरुण मंडळाचे कृष्णात पाटील. व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments