कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामुग्री दाखल
कोल्हापूर ता.07 : महापूरासह कोणत्याही आपत्तकालीन घटनेच्या सामन्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामुग्री दाखल झाल्या आहेत. जिवीत हानी होवू नये. तातडीने आपत्तकालीन परिस्थीती हातळता यावी यासाठी हि यंत्रसामुग्री महत्वाची भूमिका बजावणार आहे. 150 मिटरवरील पाण्यात अडकलेल्यांसाठी लाईफ लाईन लाँचर, कोसळलेल्या इमारतीमधील व्यक्तिस सुखरुप बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारा लोकेशन कॅमेरा आणि आगीत अडकलेल्यांच्या बचावासाठी थर्मल इमॅजीन कॅमेराचा यामध्ये समावेश आहे.
गेल्या दोन वर्षापासून पूराचे संकट शहरावर येत आहे. 2019 मध्ये आलेल्या महापूराचा यामध्ये समावेश आहे. या संकटचा सामना महापालिकेने तत्परतेने केला. भविष्यामध्ये अशी स्थिती पुन्हा निर्माण झाल्यास त्याच्या उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडे काही यंत्रसामुग्री असणे आवश्यक होते. त्यानुसार महापालिकेमध्ये दोन दिवसापुर्वीच अद्यावत अशी यंत्रसामुग्री दाखल झाली आहे. यामुळे अग्निशमन विभाग आणखीन भक्कम झाला आहे.
150 मिटरवरील पाण्यात आडकलेल्यांसाठी लाँचर
महापालिकेच्या अग्निशमन दलात अद्यावत अशी मशनरी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये लाईफ लाईन लाँचरचा समावेश आहे. याच्या मदतीने 100 ते 150 मी अंतरावरील पाण्यातील अडकलेल्या व्यक्तिस जवळ दोरी जाईल व लाईफ जॅकेट त्याच्यापर्यंत पोहचेल अशी सुविधा असणारी यंत्रणा आहे. याचेही प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा दाखल
महापालिकेच्या यंत्रसामुग्रीमध्ये अधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॅमेराही यंदा दाखल झालेला आहे. धोकादायक इमारत कोसळही असल्यास किंवा अरुंद जागेत, बोअरवेलमध्ये एखादा व्यक्ति अडकून पडल्यास त्याचे बचावकार्य करण्यासाठी महत्वाचा ठरणारा हा कॅमेरा आहे. हा कॅमेरा अडकलेल्या व्यक्ति पर्यंत जाऊन त्याची चित्रफित, त्याच्याशी संवाद साधणे शक्य होते. संबंधीत व्यक्ति कोणत्या ठिकाणी अडकलेला आहे. याची माहिती त्वरीत मिळत असल्याने जिवित हानी होण्यापासून बचाव करणे यामुळे शक्य होते. याची हताळणी कशी केली जाते याची माहितीही अग्निशमनच्या अधिका-यांकडून देण्यात आली.
आगीत अडकलेल्यांच्या बचावासाठी थर्मल इमॅजिन कॅमेरा
एखाद्या ठिकाणी आगीसारखी घटना घडल्यास धुरामध्ये अथवा आगीच्या लोटात संबंधीत व्यक्ति कोणत्या ठिकाणी अडचणीत सापडली आहे याचा शोध घेणे किंवा तेथील तापमान किती आहे. याची माहिती मिळण्यासाठी महत्वाची असणारे थर्मल इमॅजिन कॅमेराही महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफयात दाखल झाला आहे. या कॅमे-याच्या सहाय्याने धुरामध्ये अडकलेल्या किंवा आगिमध्ये अडकलेल्या व्यक्तिचा शोध घेवुन त्याला कसे वाचवले जावु शकते याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.
2019 च्या महापूरामध्ये महापालिकेच्या अग्निशमन विभागाने उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारे चोख कामगिरी बजावली. पूरामध्ये अडकलेल्यांचे प्राण वाचवले. भविष्यामध्ये अशा प्रकारे कोणती आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक साधने असणे आवश्यक आहे. याचा विचार करुन महापालिक प्रशासनाने जिल्हा नियोजन मंडळाकडे अधुनिक साधने खरेदीसाठी निधीची मागणी केली होती. राज्य शासनाने तात्काळ यासाठी निधी उपलब्ध केला. त्यातून लाईफ लाईन लाँचर, लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमॅजीन कॅमेरा महापालिकेच्या ताफयात दाखल झाले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी दिली आहे.
No comments