आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक युवक, युवतींनीमोफत प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवावा
आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक युवक, युवतींनी
सांगली, दि. 7, : कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळांची तीव्र कमतरता जाणवत आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या 18 ते 45 वयोगटातील युवक / युवतींना या योजनेंतर्गत 34 कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण शासकीय व खाजगी रूग्णालयामध्ये देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या युवक, युवतींनी https://forms.gle/
या योजनेंतर्गत 18 ते 45 वयोगटातील युवक / युवतींना वैद्यकिय तंत्रज्ञ, पंचकर्म तंत्रज्ञ, आयुर्वेद डायटेशन, इर्मजन्सी टेक्निशियन, फेलीबोटॉसिस्ट, ड्युटी मॅनेजर, मेडीकल रेकॉर्ड सहायक, इत्यादी तसेच जेष्ठ नागरिकांसाठी केअर टेकर, योगा वेलनेस ट्रेनर यासह 34 कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 0233-2600554 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.
No comments