सहकारातील आधारवड कोसळला...... *रयतचे माजी चेअरमन आनंदराव यादव यांचे निधन
प्रथमेश वाडकर :बालिंगा :प्रतिनिधी. रयत सेवा कृषी उद्योग संघाचे माजी चेअरमन व महात्मा फुले ग्राहक सेवा संस्थेचे संस्थापक
बालिंगा.ता. करवीर. गावचे जेष्ठ नागरिक सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व आनंदराव गणपती यादव. यांचे दुःखद निधन झाले. आनंदराव यादव. यांच्या अचानक निधनाने सहकारात क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.तर सहकाराची मोठी हानी झाली आहे.
गोकुळ दूध संघांचे चेअरमन विश्वास नारायण पाटील. ( आबाजी )व सहकार महर्षी स्वर्गीय एस. आर. पाटील.यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून पंच क्रोशीत ओळख होती. यादव. यांनी बालिंगा गावामध्ये रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने छत्रपती शाहू सह दूध संस्था व हनुमान विकास सेवासंस्था. व महात्मा फुले ग्राहक संस्था स्थापन करून त्या उत्तमरित्या सुरु ठेवल्या आहेत.तिन्ही संस्थेच्या स्वतंत्र इमारती बांधून संस्था कर्जमुक्त ठेवण्याच काम आनंदराव यादव यांनी केलं आहे. नियोजन बद्ध काम आणि काटकसर करून संस्था नावारूपाला आणल्या यामुळे अभ्यासू आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून याच्याकडे पाहिलं जातं होत.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन बुधवारी सकाळी नऊ वाजता बालिंगा येथे आहे.
No comments