Header Ads

Header ADS

कुरुकली कोव्हीड सेंटर सेवेला सज्ज..........राजू सूर्यवंशी

कुरुकली (ता. करवीर) येथील कोवीड सेंटर पूर्ववत सुरू करण्यात आले असून म्हाळुंगे येथील ग्रामसेवक एस . डी. पाटील यांनी कोवीड रुग्णांसाठी तीस हजारांची रेमडिस्वीर इन्जेक्शन डॉ. रोहित पाटील यांच्याकडे सुपूर्द करताना. गटविकास अधिकारी जयवंत उगले, राजू सुर्यवंशी, प्रकाश चौगले व इतर.


प्रथमेश वाडकर : बालिंगा :प्रतिनिधी. करवीर तालुक्यातील पश्चिम भागाला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असताना आरोग्य विभागाने कुरुकली (ता.करवीर) येथील कोवीड सेंटर बंद केले होते. त्यामुळे रुग्णांना खाजगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत होता.  कोवीड रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी. ( भाऊ ) यांनी याची माहिती घेऊन तातडीने कोवीड सेंटर पूर्ववत सुरु करावे अशी मागणी आरोग्य विभागाकडे केली.याची दखल घेऊन कोवीड  सेंटर सुरु करण्यात आले. कुरुकली कोव्हीड सेंटर हे रुग्णांसाठी आधारवड ठरत असल्याने  कोव्हीड रुग्ण व सर्व सामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. 

  भोगावती  खोऱ्यात ही दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत मुत्यु चे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे  हा आकडा भविष्यात मोठा होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. 

 गत साली आरोग्य विभागाने भोगावती परिसरात कोरोनाचा धोका लक्षात घेऊन  रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी कुरुकली ता. करवीर. येथील भोगावती महाविद्यालयाची इमारत ताब्यात घेऊन सुसज्ज असे कोवीड सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोनाची  रुग्ण संख्या कमी झाल्याने. हे कोवीड सेंटर बंद करण्यात आले होते.  कोरोनाची रुग्ण संख्खा मोठ्या प्रमाणात वाढ होत असून बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत होते. याची दखल घेऊन  करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सुर्यवंशी यानी पाठपुरावा केल्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलून कुरुकली येथील कोवीड सेंटर पूर्ववत करण्यात आले.असून ते सर्व सामन्य जनतेला आधार बनत आहे. 

         करवीरच्या पश्चिम भागाला कोरोनाचा विळखा बसत असताना मात्र कुरुकली येथील कोवीड सेंटर पूर्ववत गरज असताना काही तांत्रिक अडचणीमुळे सुरू करण्यास शासनाकडून वेळ लागला मी गेली महिनाभर पाठपुरावा करून हे सेंटर सुरु करायला लावले. या कोव्हीड सेंटरमुळे सर्वसामान्य जनतेला आधार मिळाला आहे. 

      राजू सुर्यवंशी .
माजी सभापती पंचायत समिती करवीर. 


        

कोवीड सेंटर पूर्ववत झाल्यापासून काही सुविधांचा अभाव होता पंरतु डॉ. रोहित पाटील व माजी सभापती राजू सुर्यवंशी यांनी मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनास लोकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे मदतीचा ओंघ सुरु आहे. 


      


No comments