Header Ads

Header ADS

यशवंत बँकेचे संस्थापक संचालकके. वाय. पाटील यांचे निधन


दोनवडे ः साबळेवाडी (ता. करवीर) येथील श्री कृष्ण दूध संस्था व श्री रामकृष्ण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केरबा यशवंत पाटील (के. वाय.) (वय 94) यांचे निधन झाले. कुडित्रे येथील यशंवत सहकारी बँकेचे ते संस्थापक संचालक होते. तसेच ग्रामसेवक म्हणून त्यांनी उत्कृष्ट  कार्य केले आहे. खुपीरे येथील बलभीम विकास व राम सहकारी पाणी पुरवठा संस्था स्थापनेत त्यांनी बळवंत हणमंत पाटील व पांडुरंग रामजी पाटील यांच्यासोबत योगदान दिले होते. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पंचक्रोशीतील  कार्यकर्ते त्यांचा सहकारातील तज्ज्ञ म्हणून आवर्जून उल्लेख करीत. त्यांची एकसष्टी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. यशवंत बँकेचे संचालक व गोकुळ दूध संघाचे सुपरवायझर राजेंद्र पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

No comments