बालिंगा गावावर छत्रपती शाहू महाराज यांचे अनंत उपकार.-- सरपंच मयूर जांभळे
बालिंगा ग्रामपंचायत मार्फत शाहू जयंती निमित्त वृक्षारोपण.
बालिंगा / प्रतिनिधी :- रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज याच्या कृपा आशिर्वादाने पूर्वी कळंबा गावच्या दक्षिणेस कात्यायनी देवी मंदिराजवळ जुने बालिंगा गाव वसलं होत. गावचं सांडपाणी कळंबा तलावात मिसळून पाणी दूषित होईल म्हणून गाव उठवून दूरदृष्टी राजा शाहू महाराज यांनी जवळपास 200 वर्षांपूर्वी बालिंगा गावाचे पुनर्वसन कोल्हापूरच्या पश्चिमेस भोगावती नदीतीरावर केले. आज छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच बालिंगा गाव सुजलाम सुफलाम आहे.असे सरपंच मयूर जांभळे. यांनी सांगून या राजाला अभिवादन केले व त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाहू जयंतीचे औचित्य साधून ऑक्सीजन वाढीसाठी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
पाण्याची टाकी, स्मशानभूमी, महादेव मंदिर परिसर, आरोग्य उपकेंद्र आदी 100 वृक्षाचे वृक्षारोपण सरपंच व ग्रा. पं. सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.झाडापासूनच ऑक्सिजनची मोठया प्रमाणात निर्मिती होते यासाठी अजून शेकडो झाडे लावणार असल्याचे सरपंच मयूर जांभळे. व उपसरपंच पंकज कांबळे. यांनी यावेळी सांगितले.
या वृक्षारोपण कार्यक्रमास सरपंच मयूर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे,तलाठी किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजय भवड,विजय जांभळे,कृष्णात माळी, संदीप सुतार,धनंजय ढेंगे,युवराज जत्राटे,सचिन माळी, अजित कांबळे,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भगत. आदिसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
No comments