बार्टी समाजकल्याण विभाग कोल्हापूर मार्फत वृक्षारोपण पंधरवडा :आशा रावण
बालिंगा / प्रतिनिधी : - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी समाजकल्याण विभाग कोल्हापूर यांच्या वतीने आशा रावण यांनी यानिमित्ताने भोगम highschool कळंबा,ग्रामपंचायत कळंबा, कळंबा कारागृह,मोरेवाडी ग्रामपंचायत, आयसोलेशन हॉस्पिटल, पंचायत समिती करवीर, कलेक्टर ऑफिस कोल्हापूर या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी करंज,जंगली भेंडी,कॅशिया, आपटा, सिल्वर ओक या प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार,भूसंपादन उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात,तहसीलदार संतोष कणसे,तहसीलदार आनंद गुरव,महसूल सहायक गजानन कुरणे,अव्वल कारकून अनुराधा सोनवणे,कलेक्टर ऑफिस चे सर्व पदाधिकारी,पंचायत समिती चे गटविकास अधिकारी जयवंत उगले,जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे,कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुलकर,तुरुंगाधिकारी आडे साहेब, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे,कार्यालयीन अधीक्षक सचिन पाटील, कळंबा ग्रामपंचायत सरपंच सागर भोगम,उपसरपंच, डॉ रमेश जाधव ,ग्रामस्थ,शाळा मुख्याध्यापक विवेक ठाकूर, शिक्षक वर्ग, सामाजिक वनीकरण वनरक्षक विकास घोलप, आशा रावण उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योजना प्रमुख मेघराज भाते व प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांचे सहकार्य लाभले
No comments