Header Ads

Header ADS

बालिंगे गावातून कोरोनाला हद्पार करा - संदीप कोळेकर











बालिंगा  : प्रतिनिधी :बालिंगा गाव कोल्हापूर शहरा शेजारी असून सुद्धा  बालिंगे  गावची  लोकसंख्या पहाता गावातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी असून ही चांगली गोष्ट आहे. याबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक करत गाव कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले.
बालिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात प्राथमिक शाळेत  10 बेडचं कोविड विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बालिंगा गावचे युवा सरपंच मयुर जांभळे होते.                   यावेळी  सरपंच मयुर जांभळे म्हणाले,     कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सच्या माध्यमातून प्रबोधन सुरु केले आहे. गावातील रुग्णांवर येथेच उपचार व्हावेत,यासाठी कोविड सेंटर सुरु केले असून त्यासाठी गावातील डॉक्टरांची खूप मोठी मदत झालीआहे.  कोरोना महामारीचा सामना करत असताना दुसऱ्या बाजूला विकासात्मक पातळीवरही पुढे जायचे आहे.असे ते म्हणाले 
स्वागत  बी न्युजचे ताज मुल्लाणी यांनी केले. ग्रामविकासअधिकारी आर. आर. भगत यांनी प्रास्ताविक केले.                                      यावेळी राष्ट्रवादी  कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे, माजी सरपंच अनिल पोवार, माजी उपसरपंच श्रीकांत भवड, उपसरपंच पंकज कांबळे, मंडल अधिकारी विलास तोडकर, तलाठी किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जांभळे, विजय जांभळे, कृष्णात माळी, रंगराव वाडकर, संदीप सुतार,अजय भवड, धनंजय ढेंगे,मुख्याध्यापक आकाराम कांबळे यासह आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा वर्कर्स,प्राथमिक शाळेच्या शिक्षिका व नागरिक उपस्थित होते.

               
*डॉक्टरांचा कोरोना रुग्ण सेवेला हातभार*....... 
             कोरोना मुक्त करण्यासाठी सरपंच मयूर जांभळे  कोरोना पेशंट साठी सर्वच उपाययोजना करीत असताना कोव्हीड पेशंटची तपासणी कोण करणारहा प्रश्न उभा असतानाच तात्काळ सरपंच यांनी गावातील सर्व डॉक्टर यांना सर्व माहिती देऊन मदत करण्यासाठी विनंती केली. सर्वच डॉक्टर यांनी कोव्हीड रुग्णांची तपासणी करण्या बरोबरच मदत करणार असल्याचे सांगितले. सरपंच यांनी विनंतीस मान देऊन कोव्हीड पेशंटची  सेवा करण्यास तयार झाले बद्दल आभार मानले.
   सरपंच -- मयूर जांभळे.
.     
*मदतीसाठी आवाहन.........* 
बालिंगा प्राथमिक शाळेत कोरोना          रुग्णांसाठी अलगीकरण कक्ष सुरु केला आहे. सर्व कोरोना पेशन्ट यांना ग्रामपंचायत मार्फत चहा व नाष्टयाची  सोय करण्यात आली आहे.याशिवाय कोणालाही कोरोना पेशंट यांना औषध व इतर साहित्य द्यावयाचे असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीशी सपंर्क साधून मदत करण्यास आवाहन करीत आहे.
         राजेंद्र भगत. ग्रामविकास अधिकारी. बालिंगा.

No comments