भाजपा कोल्हापूरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हार्दिक अभिनंदन
कोल्हापूर दि.८ काल भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी कोवीड परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व सामान्य जनतेसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आणी त्यांची प्रत्यक्ष आंमलबजावणी देखील सूरु केली. यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत वाढविण्यात आहे यामुळे नोव्हेंबरपर्यंत देशातल्या ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जाणार. त्याचबरोबर केंद्र सरकार लस मिळवण्याची आणि लसीकरणाची गती वाढवणार असून केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या लशी मोफत दिल्या जातील. आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून पासून १८ वर्षावरच्या सर्व नागरिकांसाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस पुरवणार आहे. यामाध्यमातून सर्वांना मोफत लस देण्याचा कार्यक्रम केंद्र सरकार जानेवारीपासून जोमात सुरू करत आहे. आणखी एक मह्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठीच्या दोन लशींची चाचणी देशात वेगाने सुरू आहे.
देशाच्या सक्षम पंतप्रधानांनी घेतलेल्या महत्वपूर्ण अशा निर्णयांवर आज बिंदू चौक येथील भाजपा कार्यालय प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. केंद्राच्या अशा महत्वपूर्ण निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला दिसाला मिळाल्याबद्द्ल भाजपा पदाधिका-यांनी मा.नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले.
राज्यांना लस पुरवण्याची सर्व जबाबदारी केंद्र सरकारने घेतल्यामुळे लस खरेदीचीसाठीची शिल्लक रक्कम आता या सरकारने कोविड उपाययोजनेसाठी खर्च करावी असे मत उपस्थित पदाधिकारी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रंसगी भाजपा प्र.का.सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, युवा मोर्चा अध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत आदी उपस्थित होते.
No comments