वृक्षारोपण काळाची गरज आहे.आशा रावण*...... कळंबा कारागृहामध्ये वृक्षारोपण.
प्रथमेश वाडकर :बालिंगा :प्रतिनिधी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी समाजकल्याण विभाग कोल्हापूर यांच्या वतीने आशा रावण यांनी आज कळंबा कारागृह या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. कळंबा कारागृह अधीक्षक
चंद्रमनी इंदूरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी करंज,जंगली भेंडी,कॅशिया, आपटा, सिल्वर ओक या प्रकारची 20 झाडांचे कळंबा कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. समतादूत आशा रावण,समाजकल्याण चे कार्यालयीन अधीक्षक सचिन पाटील ,सामाजिक वनीकरण चे वनरक्षक विकास घोलप, कारागृह शिक्षक सुभाष मोहिते,दिलीप भाले कृषी पर्यवेक्षक, रवींद्र दिघे प्रशासन अधिकारी, एस एल आडे वरिष्ठ तुरुंगाधिकारी उपस्थित होते
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बार्टी चे महासंचालक मा धम्मज्योती गजभिये,योजना प्रमुख मेघराज भाते प्रकल्प अधिकारी गणेश सर यांचे सहकार्य लाभले
No comments