पी. एन. पाटील. यांच्या प्रयत्नाने शिंगणापूर रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे....
प्रथमेश वाडकर :बालिंगा :प्रतिनिधी करवीर तालुक्यातील शिंगणापूर व प्रयाग चिखली दरम्यान शिंगणापूर बंधारा आहे. या बंधाऱ्याच्या चिखली गावच्या बाजूकडील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक दिवसापासून रखडले होते. काम सुरु होऊन पूर्णत्वा च्या मार्गांवर आले आहे. येत्या आठवड्यात काम पूर्ण होऊन शिंगणापूर बंधारा वाहतुकीस खुला होईल अशी माहिती संबंधित विभागाने दिली आहे.
या रस्त्याच्या कामाला भाजप व शिवसेना सरकार असताना मंजुरी मिळाली होती. पण या रस्त्याला लागून असलेल्या शेतकरी यांनी शेतीची नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणून विरोध दर्शविला होता. त्यामुळे रस्त्याचे काम एक वर्षे रखडले होते. याची माहिती करवीरचे आमदार पी. एन. पाटील. यांनी संबंधित शेतकरी यांना फोन वरून तुमची नुकसान भरपाई देण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल. आपण कामात कोणताच अडथळा आणू नये अशी विंनती केली. आणि काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे असे बांधकाम विभागास सूचना देऊन कामास सुरुवात करण्यात आली होती.गेले महिना सातत्याने काम सुरु आहे.
या मार्गाचा जवळचा तसेच शहरात न जाता बायपास रत्नागिरी, कोकणात तसेच निगवे दुमाला मार्गे पुणे, मुंबई, हायवेला जाऊ शकतो.तर पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, गगन बावडा या मार्गासाठी हा रस्ता उपयुक्त आहे. यावरून अवजड वाहतूक केली जाते.
या कामाचे नियोजन विनोद खोंद्रे,गिरीश पाटील. यांच्याकडे आहे.पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरु आहे. असे त्यांनी सांगितले.काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी या मार्गांवरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. असे ते म्हणाले.
रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सातत्याने व चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे. आठवडा भरात पावसाळ्यापूर्वी हा मार्ग वाहतूकीसाठी खुला होणार आहे.
सौ. रसिका अमर पाटील.
जिल्हा परिषद सदस्या.
2) चिखली शिंगणापूर रस्त्याचे काम 90% पूर्ण झाले असून चार दिवसात उर्वरित काम पूर्ण होऊन पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीस सुरु होणार आहे.
सुभाष पाटील. हणमंतवाडी,
सामाजिक कार्यकर्ते.
No comments