ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवसानिमित्तयेत्या बुधवारी ऑनलाईन कार्यशाळा
कोल्हापूर, दि. 14 : 15 जून हा दिवस ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस म्हणून पाळण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर डी.के.शिंदे समाजकार्य महाविद्यालय व फेडरेशन ऑफ सिनियर सिटीझन्स ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 16 जून रोजी दुपारी 12 वाजता ‘ऑनलाईन गुगल मिटद्वारे’ Link- https://meet.google.com/ptm-
सदर कार्यशाळेमध्ये फेडरेशन ऑफ सिनियर सिटीझन्स ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अरूण रोडे, फेडरेशन ऑफ सिनियर सिटीझन्स ऑफ महाराष्ट्राचे माजी उपाध्यक्ष नारायण इंगळे, ॲड. प्रमोद ढोकळे, राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्राचार्य मानसिंग जगताप हे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हयातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघटना, पदाधिकारी व नागरिक यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
No comments