जीवन आधार फौंउंडेशनचे कार्य कौतुकास्पद.--- प्रसाद संकपाळ आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षणाचा सांगता समारंभ संपन्न प्रशिक्षणा बरोबरच रक्तदान शिबिराचे आयोजन
बालिंगा :प्रतिनिधी :- आपत्कालीन काळात जीवन आधारची रेस्क्यू फोर्स टीम आपल्या आदर्श कामाचा ठसा उमटवतील असे गौरुदगार कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरचे प्रसाद संकपाळ यांनी काढले.जीवन आधार फौंउडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य ( कार्यक्षेत्र सम्पूर्ण भारत )नॅशनल अकॅडमी स्कूल चेतना मोटर,टाटा मोटर्सच्या मागे गडमुडशिंगी कोल्हापूर येथे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पोवार.यांच्या आदेशानुसार या प्रशिक्षण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या कार्यक्रमाच्या सांगता समारंभ प्रसंगी अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक कर्नल विलास सुळकुडे. व महाराष्ट्र रेस्क्यू फोर्स संपर्क प्रमुख असलम बादशाहजी सय्यद. यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
पंधरा दिवस सुरु असलेल्या कार्यक्रमात आपत्कालीन काळासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात आले.तसेच जीवन आधार फौंउंडेशन च्या वतीने रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 35 रक्तदात्यानी रक्तदानाचा हक्क बजावला.
यावेळी महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार,महाराष्ट्र राज्यमहिला उपाध्यक्ष सौ शोभा महाजन, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रविकिरण गवळी, कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष राहुल पोवार, कोल्हापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष सुदर्शन तुळसे, कोल्हापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष विजय कांबळे, कोल्हापूर जिल्हा युवक संपर्क प्रमुख सचिन बामणीकर, कोल्हापूर जिल्हा युवक गटप्रमुख चंद्रशेन तुळसे, कोल्हापूर शहर युवक अध्यक्ष शुभम पोळ, कोल्हापूर शहर युवक उपाध्यक्ष अभिषेक लष्कर, कोल्हापूर शहर युवक प्रमुख सुभाष यादव, शिरोळ तालुका युवक अध्यक्ष सचिन कमलाकर, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष दिपक बन्नानवर कोल्हापूर जिल्हा रेस्क्यू फोर्स अधिकारी विक्रम काटकर, कोल्हापूर जिल्हा महिला रेस्क्यू फोर्स अधिकारी मानसी कांबळे. आदी उपस्थित होते.
No comments