दोनवडे येथे निसर्गमित्र फौंडेशनच्या वतीने वृक्षारोपण
कोल्हापूर ः दोनवडे (ता. करवीर) येथील निसर्गमित्र फौंडेशनच्या वतीने नारळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. दोनवडे ते वाकरे या रस्त्याच्या बाजूंनी ही नारळाची रोपे लावण्यात आली. त्यांना उदय निचिते व क्रीडाई कोल्हापूरचे विशेष सहकार्य मिळाले.
यावेळी भोगावती पाणीपुरवठा अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष रामदास पाटील, बबन शिंदे, दोनवडेचे पोलिस पाटील बाजीराव मेंगाणे, सुशील शिंदे, मंगेश खोंद्रे, दीपक पाटील, रवी पोवाळकर, अमोल नगारे, सचिन नगारे तसेच सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments