बालिंगा ग्रामपंचायती कडून अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्सना प्रोत्साहन भत्ता वाटप. आशा व अंगणवाडी सेविका कोरोना योद्धा सन्मानासाठी पात्र _ सरपंच -मयूर जांभळे
प्रथमेश वाडकर /बालिंगा :प्रतिनिधी.
करवीर तालुक्यातील बालिंगा येथील ग्रामपंचायती कडून जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामस्तरावरील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांना तात्काळ प्रत्येकी 2000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता वाटप करण्यात आला .अध्यक्षस्थानी सरपंच मयूर जांभळे. होते.करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर. यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कोळेकर म्हणाले ग्रामीण भागात कोरोना आजाराने धुमाकूळ घातला आहे. पण शासनाचा आदेश शिरावर घेऊन कोरोनाला हद्दपार करून गावच्या सेवेसाठीअंगणवाडी सेविका व आशा सेविका सज्ज झाल्या आहेत.खरोखरचं आशा व अंगणवाडी सेविका कौतुकास पात्र आहेत.
सरपंच मयूर जांभळे. म्हणाले ग्रामस्तरावर वेळोवेळी आलेले संकटदूर करण्यासाठी व या संकटाशी सामना करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील ग्रा. पं.कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग नेहमीच अग्रेसर असतो. यासाठी सर्वच सरपंच बंधूनी या ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना मान -- सन्मान देण्या बरोबरच मानधन देण्याची गरज आहे.असे ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, माजी सरपंच अनिल पोवार, माजी उपसरपंच श्रीकांत भवड,उपसरपंच पंकज कांबळे, मंडल अधिकारी विलास तोडकर, तलाठी किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जांभळे, विजय जांभळे, कृष्णात माळी, रंगराव वाडकर, अजय भवड, धनंजय ढेंगे, संदीप सुतार.आदिसह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आकाराम कांबळे,आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा कर्मचारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत बी न्यूजचे ताज मुल्लानी यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भगत. यांनी मानले.
No comments