शिंदेवाडी गावाने जपली सामाजिक बांधिलकी...........* शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीस दोन ट्रक लाकडे,गावात सॅनिटायझर व मास्कचे वाटप -
बालिंगा ।प्रतिनिधी : शिंदेवाडी. ता. करवीर. ग्रामपंचायतीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशान भूमीत कोरोना मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारामुळे येथे लाकडाचा तुटवडा असल्याने दोन ट्रक लाकडे प्रदान करण्यात आली. ही लाकडे गावातील शेतकरी भैरवनाथ तुकाराम शिंदे यांनी ग्रामपंचायतीस दिली.
तसेच रिलायन्स ग्रुपमार्फत गावातील नागरिकांना मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक मारुती खडके आणि डॉ.अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यातआले.. व शिवराज्याभिषेक
शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली.
या कार्यक्रमाला सरपंच सौ.रंजना पाटील, उपसरपंच संदीप शिंदे, सदस्य सागर पाटील, रेखा सुतार जयश्री शिंदे,बळवंत पाटील, मेघा पाटील, ग्रामसेविका कु. एस.एस.पाटील,अंबाजी पाटील, तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते .ग्रामपंचायतीच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.
शिंदेवाडी: येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशान भूमीस दोन ट्रक लाकडे प्रदान करताना सरपंच रंजना पाटील, उपसरपंच संदीप शिंदे, अंबाजी पाटील, सागर पाटील, बळवंत पाटील व इतर
No comments