Header Ads

Header ADS

सामाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्याकोविड सेंटरमुळे शासनाला हातभार- पालकमंत्री जयंत पाटील





 

        सांगली दि. 6 .: सुदैवाने कोविड मर्यादेत येत आहे. आता कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट 10 ते 11 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. येत्या पाच - सहा दिवसांमध्ये हा रेट 6 ते 7 टक्क्यापर्यंत येईल. तथापि, तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकमान्य चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर संचलित स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरचा कोविड रुग्णांसाठी चांगला उपयोग होईल. अशा समाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटर मुळे शासनाला चांगलाच हातभार लागत आहे. त्यामुळे शासनावरचा काहीसा भार हलका होत आहे. असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

            वसंतदादा डेटल कॉलेज बुधगाव येथे लोकमान्य चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर संचलित स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यंवशी, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, संजय बजाज, जितेश कदम, सुरेश पाटील स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरचे संयोजयक तुकाराम मासाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या पुढाकाराने डेंटल कॉलेजच्या इमारती मध्ये सुरु करण्यात आलेल्या या कोविड सेंटरची व्यवस्था अतिशय चांगली झाली असून जवळपास 100 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये 20 ऑक्सिजन बेड, 20 लहान मुलांसाठी बेड, 50 रेग्युलर बेड व 5 व्हेटीलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये ज्या पदध्दतीने व्यवस्था असतात अशा पध्दतीच्या खाटांची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यामुळे एक चांगली व्यवस्था सांगलीकरांना व खास करुन मिरज तालुक्यातील ग्रामीण भागाला उपलब्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी सुरु करण्यात आलेल्या एका चांगल्या जनसेवेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

            कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, गेल्या दिड दोन वर्षापासून जगात, भारत व महाराष्ट्रामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समाजामध्ये प्रचंड मोठी हानी झाली, व्यवसाय ठप्प झाले. या पार्श्वभूमी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हा प्रशासन, आरोग्य अधिकारी, महसुल अधिकारी, पोलीस यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस हे सर्व दिवसरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लक्षणे व त्याचे होणारे परिणाम वेगळे असल्यामुळे त्यासाठी संघर्ष करावा लागला. आता कोरोनाची आकडेवारी आटोक्यात येत आहे. परंतु अशाही परिस्थितीत राज्याच्या व सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, ग्रामीण भागात, शहरी भागात कोविड सेंटर उभा करुन अनेक लोक, सेवाभावी संस्था, खासगी संस्था त्या परिसरातील रुग्णांना सेवा देण्याचे काम करीत आहेत.

            यावेळी पालकमंत्री जयंत पाटील व इतर मान्यवरांनी स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरची पाहणी केली.

No comments