संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे विविध संघटना आपापल्या पद्धतीने मराठा आरक्षण लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे
आज 6 जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हराळे गल्ली शिवाजी पेठ दे दणादण तरुण मंडळाच्या वतीने आरक्षणाच्या चळवळीचा एक भाग म्हणून भागातील नागरीक अनिल सावंत आणी सहकारी यांनी तयार केलेला मराठा आरक्षणासाठी आवश्यक असणारा सांकेतिक भाषेतील आराखड्याचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिनेचे पूजन करण्यात आले. यानंतर सांकेतीक आराखड़ा तयार करणारे अनिल सावंत व विकास जाधव यांनी मराठा आरक्षणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
लवकरच भागातील नागरिकांच्या उपस्थितीत हा सांकेतिक भाषेतील आराखडा मराठा आरक्षणाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांच्याकडे देण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी
संभाजीराजे यांना दे दणादण तरुण मंड़ाळाचा पाठींबा असून यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली या आराखड्यातील प्रत्येक मुद्द्यावर मराठा आरक्षण मिळण्यासाठी प्रत्येक मावळा काम करणार आहे.
No comments