Header Ads

Header ADS

वाढदिवसाच्या रक्तदान शिबीराने कोरोना रुग्णांच्या जीवनात प्रकाश*.......

प्रथमेश वाडकर : बालिंगा /प्रतिनिधी. कोरोना आजाराला आळा घालण्यासाठी शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असताना दिसत आहे. पण स्थानिक पातळीवर आपल्या गावात कोरोना आजाराचा शिरकाव होऊ नये यासाठी गावचे प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गावातील विविध सेवा संस्था यांचीही तितकीच जबाबदारी आहे. याची जाणीव ठेऊन  ही जबाबदारी      स्विकारून करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील लोकनियुक्त सरपंच प्रकाश रोटे. यांनी ग्रामस्थ्यांच्या सहकार्याने करवीर तालुक्यात वाढती कोरोना पेशंटची संख्या लक्ष्यात घेता.मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला पण फटाके, आतिषबाजी, हार तुरे या सर्वांना फाटा देऊन कोरोना पेशंट यांना रक्ताची गरज लक्ष्यात घेऊन रक्तदान शिबीर घेण्याचा निर्णय घेतला .तरुण वर्गाला रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त केले त्याला प्रतिसाद देत जवळजवळ  91 युवकांनी रक्तदान  करून शिबिरात सहभाग नोंदविला. सरपंच एवढ्या वरच थांबले नाहीत. शिंगणापूर कोव्हीड सेंटर, फुलेवाडी कोव्हीड सेंटर, कुडीत्रे कोव्हीड सेंटर  आदिना भेटी देऊन कोरोना रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, सामाजिक कार्यकर्ते रिंकू देसाई,रफिक पठाण, सचिन भोळे,सतीश चौगुले, अशोक पाटील,संदीप पाटील, गणेश वासुदेव,बबन सावरे, नितीन गवळी,विष्णू सुतार.आदींचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे सरपंच प्रकाश रोटे. यांनी सांगून सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

No comments