राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह राष्ट्रीय पातळीवरील क्रीडापुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 1 : राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहान पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार व मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांसाठी) २०२१ नामांकन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारत सरकार युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहान पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार व मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांसाठी) २०२१ पुरस्कारासाठी नामनिर्देशाचा प्रस्ताव २१ जून २०२१ सकाळी ५.०० वाजेपर्यंत केंद्र शासनास सादर करावा, तसेच विहीत कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपुर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही, तसेच अर्जदांरानी आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची/व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास surendra.yadav@nic.in किंवा gimish.kumar@nic.in या मेलवर सादर करण्याबाबत सूचित केलेले आहे. तसेच केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारांची माहिती. नियमावली व विहीत नमुना अर्ज https://yass.nic.in/
No comments