Header Ads

Header ADS

बँक ऑफ इंडिया पुणे-कोल्हापूर युनियन स्टाफ यांचेकडून महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर


कोल्हापूर ता.01 : महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी बँक ऑफ इंडिया पुणे-कोल्हापूर युनियन स्टाफ यांचेकडून ऑक्सीजन कॉन्सट्रेटर देण्यात आले. सदरचे साहित्य महापालिकेच्या विठठल रामजी शिंदे चौकात संस्थेचे अध्यक्ष उल्हास देसाई यांनी उप-आयुक्त रविकांत आडसूळ व मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांच्याकडे दिले. महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेस वस्तू स्वरुपात मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन बँक ऑफ इंडिया पुणे-कोल्हापूर युनियन स्टाफ यांचेकडून सदरचे साहित्य देण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुहास शिंदे, सहा.सचिव विकास देसाई, पांडुरंग वाईंगडे, रमेश मोहिते, निखिल कुलकर्णी, विनायक लाड, दिलीप शिंदे उपस्थित होते

No comments