Header Ads

Header ADS

*वृक्षारोपण पंधरावडा साजरा करण्यासाठी सर्व घटकांचा सहभाग महत्वाचा. आशा रावण*.बार्टी मार्फत पंचायत समिती करवीर या ठिकाणी वृक्षारोपण.


प्रथमेश वाडकर :बालिंगा : प्रतिनिधी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व समाजकल्याण विभाग कोल्हापूर यांच्या वतीने समतादूत आशा रावण यांनी आज पंचायत समिती करवीर या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी त्या म्हणाल्या वृक्षारोपण पंधरावडा साजरा करण्यासाठी सर्व घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. यावेळी करंज,जंगली भेंडी,कॅशिया, आपटा, सिल्वर ओक या प्रकारची झाडे करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले व जिल्हा समाजकल्याण अधिकारी मा.दीपक घाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,या वेळी समतादूत प्रतिभा सावंत,पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
    सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बार्टी योजना प्रमुख मेघराज भाते प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments