Header Ads

Header ADS

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर


 

        पुणेदि.१६:- मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार  मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावतीकरण करणे कार्यक्रम घोषित केला असल्याची माहिती २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी पत्रकान्वये दिली आहे.

 

            २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदार संघाच्या एकूण ३९९ यादी भागामधील १८ हजार २५६ मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत. त्यामुळे या प्रस्तावित मतदारांच्या नावाची प्रसिद्धी  मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्यजिल्हाधिकारी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या तीनही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत त्यांनी त्यांचे छायाचित्र रहिवास पुराव्यासह २०६ पिंपरी विधानसभा मतदार संघाचे कार्यालय डॉ. हेडगेवार भवनसे.नं.२६निगडी प्राधिकरण येथे समक्ष अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे बातमी प्रसिद्ध झालेपासून ८ दिवसात जमा करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघ यांचेकडून करण्यात आले आहे.

      ज्या मतदारांची या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत असल्याची माहितीही २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी दिली आहे.

No comments