म्हाळुंगे (ता.करवीर) गावाने माझे कुटुंब माझी जबाबदारी प्रभावीपणे राबवून कोरोना ला थोपवले गावच्या वेशीवर
........ प्रथमेश वाडकर:बालिंगा :प्रतिनिधी. कोल्हापूर जिल्हात कोरोना ची दुसरी लाट घातक ठरली असून गावे च्या गावे हॉटस्पॉट बनली आहेत. तर मुत्यचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु म्हाळुंगे (ता.करवीर) गावाने एकीचे बळ दाखवून माझे कुटुंब माझी जबाबदारी प्रभावीपणे राबवून कोरोना ला गावच्या वेशीबाहेर च थोपवल्याने मार्च पासून आज अखेर एकही कोरोना रुग्ण नसल्याने म्हाळुंगे पॅटर्न इतर गावांना दिशादर्शक ठरत आहे. म्हाळुंगे गावचा इतर गावांनी आदर्श घेतल्यास निश्चित गावे कोरोना पासून दूर राहतील तर अजूनही जी गावे कोरोच्या विळख्यात सापडली आहेत. तीही कोरोमुकत होतील.
म्हाळुंगे ता.करवीर येथील पाच हजार लोकसंख्या असून कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात झळ पोहोचल्याने पहिल्या लाटेची अनुभव पाठीशी घेऊन दुसरी लाट येण्या अगोदर ग्रामपंचायत प्रशासनाने, इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता समिती, महसूल विभाग व ग्रामस्थांची व खाजगी डॉक्टरांची वेळोवेळी बैठका घेऊन कोरोनाला हरवण्यासाठी मनाशी पक्का निर्धार करून कामाला सुरवात केली. इस्पुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रोहित पाटील यांनी आरोग्य टीम मार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. मास्क व सॅनिटायझरचे माझे कुटुंब माझी जबाबदारी विषयी जनजागृती करून माझे गाव माझी जबाबदारी संकल्पना राबवली. बाहेरून येणाऱ्या सर्व व्यक्तीचे सक्तीने अलगिकरण केले. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने 25 स्वयंसेवकाची नेमणूक करून विनामास्क खफिरणाऱ्या लोकांवर, तसेच जे दूध संस्था सॅनिटायझर किंवा सोशल डिस्टिग फज्जा उडवून दूध संकलन करत आहेत. अशा संस्थांवर कारवाई व दंड वसूल करण्यात आला. शासकीय नियम पायदळी तुडवून लॉकडाऊन च्या काळात सोशल डिस्टिग फज्जा उडवून संसर्ग प्रतिबंधक कायदा मोडला म्हणून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवर ग्रामपंचायत स्तरावर कारवाई करून लॉकडाऊन संपेपर्यंत ती दुकाने सील करण्यात आली आहेत. ग्रामपंचायत प्रशासनान, दक्षता समिती, आरोग्य विभाग, शासनाच्या नियमाचे तंतोतंत अमलबजावणी, व्यापक जनजागृती, सामूहिक इच्छाशक्तीला मिळालेली प्रयत्नाची जोड यामुळे आज म्हाळुंगे गावाने कोरोनाला वेळीच वेशीवर थोपवल्याने गावात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याने ग्रामस्थ सुखाने आपला संसार करत आहेत. हा म्हाळुंगे पॅटर्न आदर्शवत ठरला असून या गावाप्रमाणे कोरोनाला हरवण्यासाठी या गावचे अनुकरण करत असल्याने दिशादर्शक ठरत आहे.
यासाठी त्यांना इस्पुर्ली पोलीस ठाणे, इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र, करवीर तहसिलदार, यांचे सहकार्य लाभले.
*प्रतिक्रिया*
ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, दक्षता समिती, महसूल विभाग, स्वयंमसेवक, व ग्रामस्थांच्या एकीने कोरोनाला आम्ही गावाबाहेर थोपवणे शक्य झाले. योग्य नियोजन व कारवाई करत असताना भेदभाव न करता प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास निश्चितच कोरोनाला हरवू शकतो हे आम्ही दाखवून दिले आहे.
पार्वतीबाई चौगले
सरपंच ग्रामपंचायत म्हाळुंगे (ता.करवीर)
प्रतिक्रिया 2
आरोग्य विभागाच्या वतीने दूसरी लाट थोपवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने व जिल्हाधिकारी याच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी प्रभावीपणे राबविण्यात आली असून यामुळेच कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यात यश आले आहे.
डॉ. रोहित पाटील
वैद्यकीय अधिकारी इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र
*50 हजार दंड वसूल*
## विना मास्क, नियम मोडणाऱ्या लोकांकडून 50 हजार दंड वसूल करण्यात आला असून यामध्ये सर्व सामान्य व्यक्ती ते नेते मंडळी, शासकीय अधिकारी यांना नियम सारखाच ठेवल्याने सर्वावर वचक राहिली आहे.
No comments