ई-आर-1 विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने भरावे
सिंधुदुर्गनगरी सेवायोजन कार्यालये कायदा 1959 अन्वयेकलम 5 मधील तरतुदीनुसार शासकिय, निमशासकीय, खासगी अस्थापनेतील कर्मचाऱ्यांची माहितीचे तिमाही विवरणपत्र ई-आर-1 पत्येक तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांचे आत सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने भरावे. 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीचे विवरण पत्र ई-आर-1 www.rojgar.mahaswayam.gov.in यावेब साईटवर 31 जुलै 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावे. ज्या उद्योजक, अस्थापनांना ऑनलाईन विवरण पत्रे भरण्यास अडचणी येत असतील अशांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 02362,228835 येथे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
No comments