Header Ads

Header ADS

बालिंगा शाहू संस्थेची शंभर टक्के वसुली

बालिंगा : प्रतिनिधी :-  करवीर तालुक्यातील बालिंगा. येथील श्री. छत्रपती शाहू विकास सेवा संस्थेची सभासद पातळीवर  व बँक पातळीवर  सलग 11 व्या वर्षी शंभर टक्के वसुली झाली आहे. संस्थेला सतत 'अ ' ऑडिट वर्ग मिळाला असून संस्थेचे कामकाज उत्कृष्ट आहे.सभासद व कर्जदारानी वेळेवर कर्ज परतफेड केल्याने तसेच के. डी. सी. सी. बँकेचा सर्व कर्मचारी स्टाफ व निरीक्षकांच्या  सहकार्यामुळे शंभर टक्के वसुली झाली असल्याचे संस्थेचे चेअरमन मारुती सदाशिव भवड. व व्हा. चेअरमन जनार्दन गुंडा जांभळे. यांनी सांगितले.
   यावेळी संस्था संचालक मारुती भवड, जनार्दन जांभळे, भाऊसो जाधव, अनिल पोवार, अनिल कोरे, मधुकर जांभळे, गुंडा माळी, बाबू जांभळे, सदाशिव कांबळे, सुमन ढेंगे, रंजना जांभळे, तज्ञ् संचालक बाबासाहेब जाधव, सुभाष मोहिते.व संस्था स्टाफ तानाजी पाटील, संजय जाधव, सचिन माळी आदी उपस्थित होते.

No comments