Header Ads

Header ADS

100 % लसीकरण करा मगच टेस्ट करा. बालिंगा ग्रामस्थाकडून निवेदन

       बालिंगा :  प्रतिनिधी :- सध्या शासनाच्या वतीने गावोगावी कोरोना टेस्ट घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.परंतु या टेस्टच्या घाईगडबडीत लसीकरण करायचा शासनाला विसर पडला आहे. यासाठी शासनाने पहिलं लसीकरण करा नंतर टेस्ट घ्यावी असे निवेदन जिल्हा लसीकरण अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूरचे फारुक देसाई.यांना बालिंगा गावचे सरपंच  मयूर जांभळे.  उपसरपंच पंकज कांबळे.व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे. यांनी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले .
  निवेदनाचा आशय असा बालिंगा गावची लोकसंख्या 10000 हजार इतकी आहे.पैकी आजअखेर 1100 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.यामध्ये बहुतांश लोकांचा पहिला डोस झालेला नाही.याशिवाय दुसरा डोस घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार विचारणा होऊ लागली आहे.लसीकरणाला वेळ शासनाकडूनचं होऊ लागला आहे.त्यात तालुका स्तरावर अँटीजेन टेस्ट तसेच  आर. टी. पी. सी. आर. टेस्टची सक्ती केली जातं आहे.यामध्ये ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती झोकून काम करीत आहेत.बालिंगा गाव शहराशेजारी असल्यामुळे लोक जागरूक आहेत.जर दोन दिवसात लस उपलब्ध झाली नाहीतर ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती व ग्रामस्थ यांनी गावात घेतल्या जाणाऱ्या सर्व टेस्ट बंद करण्यात याव्यात. तसेच कोरोना नियम ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती याला जबाबदार राहणार नाही.पुढील होणाऱ्या परिणामास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जांभळे,रंगराव वाडकर, अजय भवड, विजय जांभळे,कृष्णात माळी आदी उपस्थित होते.

No comments