सीमाभागात 25 रोजी पहिले ऑनलाईन साहित्य संमेलनश्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्ष; दोन सत्रांत संमेलन
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे रविवार, दि. 25 रोजी सकाळी 11 वाजता पहिले ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहेे.
संमेलन दोन सत्रांत होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीराम पचिंद्रे उपस्थित राहणार असल्याची माहिती अ. भा. मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
राज्याध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले, या संमेलनाचे उद्घाटक दोन दिवसांत निश्चित होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसंत संजय मोरे उपस्थित राहणार आहेत. निवेदन रणजित चौगुले करणार आहेत. संमेलनाचा लाभ अधिकाधिक साहित्यप्रेमींनी घ्यावा, यासाठी सोशल मीडियाच्या विविध माध्यमांचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, महिला प्रतिनिधी अरुणा गोजे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष डी. बी. पाटील, प्रा. मनीषा नाडगौडा आदी उपस्थित होते. रोशनी हुंदरे यांनी आभार मानले.
No comments