लसीकरण मोहिमेतंर्गत दिव्यांगांना लस
कोल्हापूर, दि. 13 :जिल्ह्यातील 12 ही तालुक्यामध्ये विशेष लसीकरण मोहिमेतंर्गत 834 दिव्यांगाना लस देण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
आतापर्यंत शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या 164 विद्यार्थ्यांचे तर व्यवसाय, नोकरीनिमित्त विदेशी जात इच्छिकणाऱ्या 142 नागरिकांचे तसेच 23 तृतीय पंथीयांचे ही विशेष लसीकरण मोहिमेतंर्गत लसीकरण करण्यात आले.
प्रत्येक सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 ते 2 या वेळेत विशेष कॅम्पचे (सत्र) आयोजन करण्यात येणार असून या विशेष सत्राव्दारे दिव्यांगांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
या लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये तसेच उर्वरीत दिव्यांगांनी व गरजूंनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
No comments