Header Ads

Header ADS

जिल्ह्यातील 78 गावात 100 टक्के लसीकरण पूर्ण

 कोल्हापूर, दि. 13 : जिल्ह्यातील 78 गावांमध्ये 45 वर्ष आणि त्यापुढील वयांच्या नागरीकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांचेही 100 टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे.
            या 78 गावांमधील 33 गावांमध्ये कोरोनाचे शुन्य रुग्ण, 30 गावात 5 पेक्षा कमी रुग्ण, 9 गावांमध्ये 10 पेक्षा कमी रुग्ण तर 6 गावांत 10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सध्या उपचाराधीन आहेत. या 78 गावांनी नियोजनबध्दरित्या प्रयत्न केल्यामुळे केवळ 244 इतके रुग्ण आढळून आले असून या कोरोना रुग्णांवर उपचार सुर आहेत. लवकरच हे रुग्ण बरे होतील असा आशावाद आरोग्य विभागाने व्यक्त करत इतर गावांनीही कोरोनाला गावच्या वेशीवर थोपवून धरावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले.
00000

No comments