Header Ads

Header ADS

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार- सहायक आयुक्त ज. बा. करीम


सांगली, दि. 14,  :  जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती व मार्गदर्शन या विषयावर दि. 15 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. युवक, युवतींनी https://meet.google.com/coi-bgqy-bni या सेमिनारच्या लिंकवर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसामुग्री इत्यादींच्या आधारे जिल्ह्यातील रोजगार, स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करून या क्षेत्रांच्या कौशल्याच्या मागणीनुसार विशिष्ट अभ्यासक्रम राबविणे. तसेच प्रशिक्षणासाठी उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणे या उद्दिष्टाकरिता प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियान, मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 (PMKVY 3.0), किमान कौशल्य विकास कार्यक्रम या योजना राबविल्या जातात.

कौशल्य विकास  उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन 2015 पासून सुरू करण्यात आलेल्या जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून यावर्षी दि. 15 जुलै रोजी सांगली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण संस्थेमध्ये कौशल्य विकास व उद्योजकता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान, चर्चा सत्रांचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण संस्थेमध्ये कौशल्य विकास या विषयावर विविध प्रकारच्या (लेखी/वक्तृत्व) स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे श्री. करीम यांनी सांगितले.

No comments