Header Ads

Header ADS

जिल्ह्यातील वारणा धरणात 21.62 टी.एम.सी. पाणीसाठा

  सांगली, दि. 14,  : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी  8  वाजेपर्यंत  21.62  टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

            विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना  44.43 (105.25),  धोम   6.24 (13.50),  कन्हेर  4.58 (10.10),  दूधगंगा   10.07 (25.40),  राधानगरी  3.14 (8.36),  तुळशी  1.74 (3.47),  कासारी  1.46  (2.77),  पाटगांव  2.03  (3.72),  धोम  बलकवडी  1.78  (4.08),  उरमोडी  5.68  (9.97),  तारळी  3.72  (5.85), अलमट्टी   91.66 (123).

            विविध धरणातून सांडवाकालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 24,  वारणा 700,  दुधगंगा  100,  राधानगरी  1200,  कासारी  250,  उरमोडी  450  व अलमट्टी  10 हजार 873 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

            विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी    कंसात इशारा पातळी  फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा  पूल  कराड 5.10 (45), आयर्विन  पूल सांगली  8.3 (40)  व अंकली पूल हरिपूर 8.6 (45.11).


No comments