करवीर पश्चिम परिसरात धुवाधार पाऊस, कोगे व महे- कसबा बीड पूल पाण्याखाली. महापुराच्या दिशेने वाटचाल*
प्रथमेश वाडकर / प्रतिनिधी.
करवीर पश्चिम परिसरात धुवाधार पाऊस झाल्याने महे-कसबा बीड व कोगे पूल पाण्याखाली गेले आहे. गेली दोन दिवस मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी पात्राच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होत आहे. आज सकाळी पाच वाजता करवीर तालुक्यातील कसबा बीड व कोगे पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. महे कसबा बीड दरम्यान पुलावरून होणाऱ्या जवळपास 25 गावाचा संपर्क तुटला आहे. कोगे- कुडित्रे व कसबा बीड- महे यादरम्यान या दोन्ही पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
पावसाची संततधार असल्याने पाण्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या ज्या गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते, त्यात भागांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पालन करून पुरग्रस्त लोकांना अलगीकरण करणे गरजेचे आहे.नैसर्गिक आपत्ती समोर काय होईल ? याचे मूल्यमापन करणे कोणासही शक्य नाही. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन ज्या ठिकाणी पूर येतो त्या ठिकाणच्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी नियोजन करणे गरजेचे आहे.
No comments