*महापुरात केलेले बालिंगेचे सरपंच मयूर जांभळे. यांचे कार्य कौतुकास्पद*,,,,!
बालिंगा / प्रतिनिधी :- नेहमीच येतो पावसाळा या युक्तीप्रमाणे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे कुटुंब प्रमुखांच कामआहे.याची जाणीवव जबाबदारी समजून बालिंगा गावचे सरपंच मयूर मधुकर जांभळे.व त्यांचे सहकारी यांनी गावचा पाणी पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरु करण्यासाठी एक महिन्यापूर्वी नदीकाठावर असलेल्या ट्रान्सफॉर्मची पूर्वीची तीस फुटाची उंची वाढवून चाळीस फूट करून उंची करून घेतली.त्यामुळे प्रत्येक वर्षी ट्रान्सफॉर्म पुरात बुडून तब्बल 15 दिवस पाणी पुरवठा खंडित व्हायचा. सरपंच मयूर मधुकर जांभळे यांची दूरदृष्ठी आणि कामातील तत्परता यामुळेच 15 दिवस गावचा बंद पडणारा पाणी पुरवठा अवघ्या दोन दिवसात सुरु करण्यास यश मिळाले. पाणी पुरवठा सुरु होणार हे कळताच प्रामुख्याने महिला वर्गातून सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांच्या कामाचे कौतुक होतं आहे.गेले तीन दिवस संततधार पडलेल्या मुसळधार पावसामुळे करवीर तालुका जलमय झाला आहे. आलेल्या महापुरामुळे बालिंगा गावच्या पश्चिमेस असलेल्या भोगावती नदीच्या पाणी पात्रात वाढ होऊन गावातील पाणी पुरवठा बंद झाला होता. आज रविवारी सकाळ पासून तो सुरळीत करण्याचे काम सुरू होतं पण पावसामुळे पाण्याची पातळी वाढत होती. त्यामुळे अडचण येते होती.पण बालिंगा गावचे सरपंच मयूर मधुकर जांभळे.व त्यांचे सर्व सहकारी यांनी नवीन वाढीव केलेल्या ट्रान्सफॉर्म जवळ पुराच्या पाण्यातून बोटीतून अर्धा किलोमीटर जाऊन ट्रान्सफॉर्मची पाहणी केली. पाणी पुरवठा सुरु होणार याची खात्री झाल्यावर त्यांनी पाणी पुरवठा तात्काळ सुरु करण्याचा निर्णय घेतला.महापुरामुळे बंद असलेला गावचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी वीज वितरणचे कर्मचारी सचिन दुधाने,विशाल पाटील, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना बोटीत सोबत घेऊन तब्बल अर्धा किलोमीटर पुराच्या पाण्यात नदी पात्राजवळ पाण्याच्या मुख्य प्रवाहात पोलवर जाऊन काम केल या पोलवर काम केल्यामूळे बालिंगा गावचा पाणी पुरवठादोन दिवसात सुरळीत करण्यास मदत झाली. पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे,सरपंच मयूर जांभळे,पांडुरंग वाडकर,ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जांभळे,,धनंजय ढेंगे, विजय जांभळे आदिसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भगत,तलाठी किरण पाटील, कोतवाल रघुनाथ कांबळे क्लार्क संतोष जाधव, संदीप कोरवी,संतोष कांबळे,सुरेश पोवार, विजय जत्राटे, अक्षय कांबळे, संदीप कांबळे, रघुनाथ कांबळे, गावातील नागरिक यांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने बालिंगा गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम यशस्वी झाले. महावितरणचे बालिंगा गावात असणारे वायरमन सचिन दुधाने, विशाल पाटील.यांचे बालिंगा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मयूर जांभळे, यांनी आभार मानले. बालिंगा गावचे सरपंच व त्यांचे सर्व सहकारी यांनी गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी घेतलेली जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडली त्यामुळे सरपंच, उपसरपंच, व सर्व सदस्य यांचे परिसरात कौतुक होतं आहे.
No comments