बालिंगा, नागदेवाडी पंपिंग स्टेशनला प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट
बालिंगे:येथील पाणीपुरवठा योजनेस प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी भेट देऊन पाहणी करताना
बालिंगा /प्रतिनिधी :-
कोल्हापूर महानगर पालिकेच्या प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगे,नागदेववाडी येथील पाणी उपसा केंद्रांना सोमवारी सकाळी भेट देऊन पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी यंत्रणा कार्यरत केली.
कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारे तीनही उपसा केंद्रांना महापूराच्या पाण्याचा विळखा पडल्याने हे पंपिग स्टेशन गेले चार दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा गेले चार दिवसापासून खंडीत झालेला आहे. पुराचे पाणी ओसरु लागल्याने बालिंगा उपसा केंद्रात दोन ते तीन फुट पाणी असतानाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी तातडीने युध्द पातळीवर पंपिंग स्टेशनमधील मोटारी बाहेर काढल्या. गोकूळ शिरगांव एमआयडीसीमध्ये त्या मोटारी हिटींगसाठी पाठविण्यात आल्या होत्या. सोमवारी पुराचे पाणी उतरल्याने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बालिंगा व नागदेवाडी पाणी उपसा केंद्रांना सकाळी भेट दिली. याठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त नितीन देसाई, जल अभियंता अजय साळुंखे उपस्थित होते. यावेळी प्रशासकांनी नागदेवाडी येथीलही पाणी पुरवठा सुरु करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सुचना जल अभियंता यांना दिल्या.
एमआयडीसीमध्ये बालिंगा येथील पाठविण्यात आलेल्या मोटारी सोमवारी दुपारी मिळाल्याने सायंकाळपर्यंत या मोटारी बालिंगा पंपिंग स्टेशन येथे बसविण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम पुर्ण झालेस रात्रीच पाणी उपसा करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी बालिंगा पंपिग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या भागाला पाणी पुरवठा पुर्ववत करण्याचे नियेाजन पाणी नियेाजन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. हे पंपिंग स्टेशन सुरु झाल्यास शहरातील ए, सी, डी व बी वॉर्ड काही भागात पाणी पुरवठा सुरळीत सुरु होईल. त्याचबरोबर नागदेवाडी येथील मोटारी खोलून बाजूला काढण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी स्टेशनला जाणे येण्याच्या रस्त्यावर पाणी असल्याने गाडी जाणेसाठी मार्ग उपलब्ध नाही. हा रस्ता खुला झाल्याबरोबर या मोटारी हिटींगसाठी पाठविण्यात येणार आहेत.
No comments