Header Ads

Header ADS

राजाराम ऱ्हायकर. यांना लोकराजा शाहू गौरव पुरस्कार जाहीर

बालिंगा : प्रतिनिधी :- सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आविष्कार फाउंडेशन इंडिया यांचे वतीने लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती  निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येते.
    विद्या मंदिर खामकरवाडी (को.) तालुका राधानगरी शाळेचे अध्यापक  राजाराम चंद्रकांत ऱ्हायकर यांना ही यावर्षीचा शैक्षणिक क्षेत्रातील राजर्षी शाहू गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सन २०२१ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राजाराम ऱ्हायकर सर यांनी गेली अकरा वर्षे विद्या मंदिर खामकरवाडी या शाळेत अविरत कष्ट घेऊन शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे उत्कृष्ट कार्य केले. आजपर्यंत लोकसहभागाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा भरीव निधी जमा करून शैक्षणिक उठाव मधून शालेय इमारतीचे सुशोभीकरण करून शाळेचे रुपडे पालटविण्याचे काम केले आहे.खामकरवाडी सारख्या दुर्गम भागात मुलांना शिक्षणाची गोडी लावतानाच त्यांच्यात स्पर्धा परीक्षेची सुद्धा आवड निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवर ऱ्हायकर  यांच्या इयत्ता चौथी प्रज्ञाशोध तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश संपादन केले आहे. तंत्रस्नेही अध्यापनाच्या माध्यमातून आपल्या अध्यापन अधिक प्रभावी करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण केली 
आहे  .वृक्षारोपण ,पर्यावरण जागृती ,व्यसनमुक्ती ,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा विविध सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे या त्यांच्या शैक्षणिक कामाची दखल घेऊन अविष्कार फाउंडेशनच्या वतीने त्यांना लोकराजा राजर्षि शाहू गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या त्यांच्या सर्व कामात त्यांच्या शाळेतील मुख्याधापक सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

No comments