Header Ads

Header ADS

*आरळे - घानवडे मार्गावरील वाहतूक सुरु* कसबा बीड धरण वाहतुकीस खुला

बालिंगा /प्रतिनिधी :-- बालिंगा -- आरळे  मार्गावर महे -- कसबा बीड दरम्यान असलेल्या धरणावर पुराचे पाणी आल्यामुळे महे गावापासून घानवडे पर्यंतच्या गावांचा संपर्क तुटला होता,कसबा बीड ते घानवडे गावाला जाण्यासाठी बालिंगा -- सांगरुळ मार्गे म्हारूळ बीड शेड असा लांबचा प्रवास करावा लागत होता. आज 6 व्या दिवशी या धरणावरील पुराचे पाणी कमी होऊन वाहतुकीस खुला झाला आहे. आज सकाळी दहा वाजता या धरणावर दिड फूट पाण्याची पातळी होती. सायंकाळी 4 च्या दरम्यान पातळीत झपाट्याने घट होऊन पाणी धरणाच्या खाली गेले.  कसबा बीड धरणावरील पाणी कमी होऊन वाहतूक सुरु झाली आहे. गेली आठवडा भरपुराच्या पाण्यामुळे गावाकडे जाता आले नाही. पण धरणावरील पाणी कमी झाले आहे.असे समजताच प्रवाशी वर्ग लवकरात लवकर आपल्या गावाकडे जाण्यासाठी तयारिला लागल्याचे दिसत होते.

No comments