*सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे मन सह्याद्री एवढे*..
प्रथमेश वाडकर :प्रतिनिधी :-- बालिंगा गावच्या पश्चिमेस असलेल्या भोगावती नदीला आलेल्या महापुरात बचाव कार्यात मग्न असणाऱ्या एनडीआर एफच्या जखमी जवानावर बालिंगा ता. करवीर येथील कोल्हापूर गगन बावडा महामार्गावर असणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी मोफत उपचार करून आम्ही कोल्हापुरी याची आठवण करून देण्याबरोबरच माणुसकी अजूनही जिवंत असल्याची प्रचिती आणून दिली. त्यामुळे पुन्हा एकदा या निमित्ताने कोल्हापूरच्या माणुसकीचे दर्शन घडले.
अधिक माहिती अशी बालिंगा -- पाडळी खुर्द येथे भोगावती नदीच्या महापुरात अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य एनडीआरएफ चे पुणे येथील जवान करीत होते.सोमवारी दुपारी करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथे महापुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पुण्यातील 'एनडीआरएफ ची रेस्क्यू बोट भोगावती नदी काठावर पोहचली.यावेळी बोटीतील जवान दयानंद गणपती गुरव. यांचा तोल जाऊन पाण्यातील खडकावर आपटले. त्यांच्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली. वेदना सहन न झाल्याने त्यांना त्यांच्या सहकाऱ्यानी तातडीने बालिंगा येथील सह्याद्री या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे डॉ. अमर देसाई, डॉ. दिपक शिंदे, चंद्रकांत नलवडे, प्रदीप पोवार. यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी केली. केले उपचाराचे बिलं देण्यासाठी जवान डॉक्टर यांच्याकडे गेले असता पैसे स्वीकारण्यास नकार दिला. तर माणुसकीच्या नात्याने जखमी जवनाला मोफत औषध देऊन पाठवण्यात आले. जखमी जवान आणि सर्व टीमने कोल्हापूरकरांच्या माणुसकीचे आभार मानले.
No comments