Header Ads

Header ADS

जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती रसिका अमर पाटील. यांनी केली पूरग्रस्थाच्या भोजनाची सोय*.

*
प्रथमेश वाडकर :- प्रतिनिधी -आधीच कोरोना डोक्यावर नागोबा सारखी फडी काढून बसलाय.आणि त्यात गेली तीन दिवस महापूरानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे संपूर्ण करवीर जलमय झाला आहे. पुराच पाणी करवीरच्या पश्चिम भागात घराघरात पुराचं पाणी शिरलं आहे. सध्या कोरोना आजाराच्या भीतीने माणूस माणसाला भेटायचा पुर्ता बंद झाला आहे. बालिंगा गावातील जवळपास 50 ते 60 घरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.जवळपास (250 लोक) सर्वच्या सर्व कुटुंबातील लोक आपली घरं सोडून इतरत्र ठिकाणी राहायला गेली आहेत. ग्रामपंचायत बालिंगा सरपंच मयूर जांभळे. व उपसरपंच पंकज कांबळे.ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,कोरोना दक्षता समिती, तलाठी किरण पाटील, कोतवाल रघुनाथ कांबळे.आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भगत, ग्रामपंचायतीचे सर्व  कर्मचारी यांनी सर्वांनाचं वेळीच सावध करून त्यांना जीवनाउपयोगी साहित्य घेऊन घरातून स्थलांतर होण्यासाठी मदतकार्य केले आहे. तर शिंगणापूर जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती सौ. रसिका अमर उर्फ अमृत पाटील. यांचे पती दिल्या शब्दाला जागणारं एक आदर्श व्यक्तिमत्व युवकांचे आशास्थान अमर उर्फ अमृत पाटील. ( शिंगणापूरकर )यांनी  स्वतःच्या घरात शिंगणापूरात पुराचं पाणी आलं असताना सुद्धा त्यांनी पहिला आपला मतदार जगला पाहिजे या भावनेतून संपूर्ण शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन विचारपूस केली. प्रत्येक गावातील कुटुंबातील सर्व लोकांची माहिती ग्रामपंचायत कडून घेऊन सर्व पूरग्रस्त लोकांच्या  जेवणाची सोय केली. बालिंगा गावातील 200(दोनशे) पूरग्रस्तांची जेवणाची सोय करण्यात आली. पूर्ण पूर ओसरू पर्यंत जेवणाची व्यवस्था सुरूच ठेवणार असल्याच सांगून माझा मतदार संघ हेच माझं कुटुंब आहे.हे सांगण्यास ते विसरले नाहीत. त्यांना सुरक्षित ठेवणे हे माझं आद्य कर्तव्य आहे . बालिंगा गावच्या विकासासाठी दीड कोटींचा निधी दिला आहे. कामाच्या पुर्ततेसाठी बालिंगा सरपंच मयूर जांभळे. उपसरपंच पंकज कांबळे. सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले असे ते यावेळी म्हणाले.आणि मतदार संघाची प्रामाणिक सेवा आणि मतदार संघात केलेली साडे सोळा कोटीची विकास कामे यामुळेच माझी पत्नी रसिका पाटील. यांना शिक्षण व अर्थ या पदावर बसण्याचा मान मिळालाआहे. अमर पाटील. यांच्या आदर्श कार्याची पंचक्रोशीत चर्चा होतं आहे.

No comments