शहरात 18 वर्षावरील 430 नागरीकांचे लसीकरण
कोल्हापूर ता.10 : मंगळवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 ते 45 वर्षापर्यंत 430 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 91 व दुसरा डोस 339 नागरीकांना देण्यात आला. 45 ते 60 वर्षापर्यंत 577 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले तर 60 वर्षावरील 325 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. फ्रंन्टलाईन 27 वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले. सर्वांची मिळून 1359 नागरीकांचे आज लसीकरण करण्यात आले.
बुधवार, दि.11 ऑगस्ट 2021 रोजी 18 वर्षे वयोगटावरील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन 28 दिवस झाले आहेत अशांना दुसरा डोस प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ,आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिध्दार्थनगर, मोरेमाने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.
No comments