Header Ads

Header ADS

आयुर्वेद, योग शिक्षणातून पिढी घडवणारा आरोग्यपूजकमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आयुर्वेदाचार्य डॉ.बालाजी तांबे यांना श्रद्धांजली

 मुंबईदि. 10 : आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहेअशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे शोकसंदेशात म्हणतातआयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देशविदेशातही प्रसार केला. आहारविहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहेहा संदेश त्यांनी सहजसोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments