जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखालीराधानगरीतून 1400 क्युसेक्सचा विसर्ग
कोल्हापूर, दि. 13 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 228.02 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे एकूण 2 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-228.02 तुळशी -94.07, वारणा -877.01, दूधगंगा-636.90, कासारी- 62.16, कडवी -71.24 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-63.75, पाटगाव 98.19, चिकोत्रा- 41.23, चित्री - 53.12 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.02, घटप्रभा - 36.41, जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 16 फूट, सुर्वे 18.1, रुई 43.6, इचलकरंजी 39.6, तेरवाड 38.6, शिरोळ 29.9 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 27 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
No comments