जीवन आधार फॉउंडेशनचा चिपळूणच्या पूरग्रस्तांना एक घास आपुलकीचा
प्रतिनिधी /प्रथमेश वाडकर
एक घास आपुलकीचा देत आपल्या कुवतीप्रमाणे पूरग्रस्त लोकांना फुल ना फुलांची पाकळी मदत करून त्यातून सर्वाना सावरूया.एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे ब्रिद वाक्य सोबत घेऊन जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स कार्यक्षेत्र संपूर्ण भारत मार्फत संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पोवार. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिवृष्टीने व महापुराने अनेकांचे संसार उध्वस्त झाले होत्याचं नव्हतं झालं त्यांना आधार देण्याचं काम कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार, महाराष्ट्र राज्य युवक सचिव अरविंद कांबळे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष धनंजय सराटे, भारत शिंदे, अक्षय खोत, अक्षय शिंदे, आदीनी ज्या ठिकाणी अतिवृष्टीने व महापुराने भयंकर नुकसान झाले त्या चिपळूण गावास भेट देऊन आपल्या वतीने मुरादपूर व बहादूर नाका चिपळूण येथील पूरग्रस्तांना वस्तू रूपात मदत केली.यामध्ये तांदूळ, साखर, तेल, चटणी, डाळ, चहा पावडर, पाणी बॉटल आदी वस्तूंचा समावेश केला होता. मदत करतेवेळी चिपळूणकर भारावून गेले कारण आमच्यासाठी कोल्हापूरहुन मदत घेऊन येऊन आधार देण्याचं काम या युवकांनी केल्याने कोल्हापूरातील माणुसकीचे दर्शन चिपळूण करांना घडलं सर्व पूरग्रस्तांनी जीवन आधार फौंडेशनचे व युवकांचे आभार मानले.
आधार देण्यासाठी धावून आलेली कोल्हापूरची युवापिढी चिपळूण करांच्या मनात घर करून गेली हे मात्र नक्की!
No comments